---Advertisement---

लाडकी बहिण योजना नोव्हेंबर चे पैसे ऑक्टोंबर मध्येच.

---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेबद्दल महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी जनसन्मान यात्रेच्या वेळी बीड जिल्ह्यातील परळी शहरात आयोजित सभेत सांगितले की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठीच्या या योजनेतील तिसऱ्या हप्त्याचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत संबंधित महिलांच्या खात्यात जमा केले जातील.


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांच्या सशक्तिकरणासाठी महत्त्वपूर्ण असून, यासाठी लाखो अर्ज स्वीकारले गेले आहेत. याआधी दोन हप्ते जमा झाले आहेत.’लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी जमा झाला असून आता महिलांना पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. याशिवाय, आगामी नऊ महिन्यांसाठी ३५ हजार कोटींच्या तरतूदीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना येत्या नऊ हप्त्यांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment