लाडकी बहिण योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे.योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० अर्थसाह्य दिले जात आहे.लाडकी बहिण योजना पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता ही पोहचला आहे. महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यास अडचण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी
योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना त्यांची यादीत नावे आहेत की नाहीत हे ऑनलाइन तपासता येईल. खालील स्टेप्स फॉलो करून महिलांनी यादीत आपले नाव तपासावे:
1. सर्वप्रथम, महिलांनी त्यांच्या फोनवरून ‘प्ले स्टोअर’ वर जाऊन ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप डाउनलोड करावे.
2. ॲप उघडल्यावर, विचारलेली सर्व माहिती भरावी.
3. मुख्यपृष्ठावर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा पर्याय निवडावा.
4. त्या पेजवर ‘लाभार्थी यादी पाहा’ हा पर्याय निवडावा.
5. यादीत आपले नाव आहे की नाही ते तपासावे.
जर आपले नाव यादीत असेल तर लवकरच आपल्याला अनुदानाचे पैसे मिळतील. परंतु, जर नाव यादीत नसेल, तर आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.